१२ जानेवारी:- सिंदखेड येथे लाखोंच्या उपस्थितीत जिजाऊजन्मोत्सव साजरा
" राजमाता जिजाऊंचे स्मरण करून विषमतावादी धर्माचे संस्कार नाकारून समतावादी शिवधर्माचा आम्ही स्वीकार करीत आहोत,'' अशा शब्दांत येथील जिजाऊसृष्टीवर उपस्थित जनसमुदायाने डॉ. विजया कोकाटे, मंदा लिमसे आणि आमदार रेखा खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शपथ घेतली. ......मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित शिवधर्म दीक्षा समारंभ घेण्यात आला. उपस्थितांनी यावेळी या नव्या धर्माचा स्वीकार शनिवारी (ता. १२) केला
मदन पाटील यांची "जिजाऊसाहेब" कादंबरी
jijausaheb
"जिजाऊसाहेब" कादंबरीवर चित्रपट निर्मिती
"जिजाऊ साहेब' कादंबरीवर चित्रपट निर्मिती करणार - सौ. निमसे राहाता, ता. २६ - प्रसिध्द लेखक मदन पाटील यांच्या "जिजाऊ साहेब' या सध्या चर्चेत असलेल्या कादंबरीवर चित्रपट काढणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने जिजाऊ मॉं साहेबांचे स्फूर्तिदायी चरित्र जनतेसमोर यावे, असा आमचा प्रयत्न आहे, ....अशी माहिती या चित्रपटाच्या निर्मात्या व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. मंदाताई निमसे यांनी "jijau.blogspot.com'शी बोलताना दिली. सौ. निमसे म्हणाल्या, की मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून आपल्याला जी सामाजिक दृष्टी मिळाली, त्यातून मला हा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली. युगपुरुष शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊ मॉं साहेबांविषयी अत्यंत कमी लिखाण झाले आहे. लेखक मदन पाटील यांच्या कादंबरीला त्यादृष्टीने वेगळे महत्त्व आहे. लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा मॉं साहेबांचा स्वभाव. त्यांनी घडविलेली माणसे, त्यांच्या जीवनातील प्रसंग, या चित्रपटात असतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट संस्कारक्षम आणि समाजाला संदेश देणारा असेल. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. श्रीरामपूरचे बाबासाहेब सौदागर यांच्याकडे गीतलेखनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. "राजमाता जिजाऊ' या नावाने मराठी चित्रपट महामंडळाकडे या चित्रपटाची नोंदणी करण्यात आली आहे. कलाकारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे सौ. निमसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment