
जिजाऊसाहेब .....जगाच्या इतिहासतील एक महाशक्तिशाली स्त्री ....जिने जगाला दोन छत्रपती दिले ...स्वराज्य संकल्पक शाहाजीराजांच्या संकल्पाला प्रेरक ठरलेली..., नाउम्मेद ,निसत्व व मुर्दाड बनलेल्या मराठ्याना जागे करणारी एक विरमाता....राजमाता ...."जिजाऊसाहेब"जिने लहानपणापासूनच शिवबाला शौर्याचे ,धाड़साचे बाळकडू पाजले,संभाजीराजाना घड़विले, महाराष्ट्राचा सांभाल केला .......
मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतीहासिक कादंबरीची प्रस्तावना त्यांच्याच शब्दात.....
त्रिवार मानाचा मुजरा .......
इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्री-व्यक्तीमत्वानी आपल्या कार्याचा ठसा उमटवीला आहे, त्यात अग्रभागी असणारे नाव आहे "जिजाऊ साहेब"... त्यांच्या कार्याची नोंद आज जगभरात घेतली जात आहे.त्या कालात मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि निसत्व वातावरण निर्माण झाले होते.
पारतंत्र्य आणि गुलामगिरीबद्दल कुणाला तिटकारा वाटत नव्हता ,स्वातंत्र्य गमावलेल्या बद्दल खेद नव्हता,भूमिपुत्राना मुस्कटदाबी मुकाट्याने सहन करावी लागत होती,"आसमानी" आणि "सुलतानी" ला तोंड देता देता रयत पिचली होती,आणि दैववादी बनून आजचे मरण उद्या वर ढकलत होती...
मराठी मुलुखातिल या प्रस्थापिताला उलथून टाकन्यासाठी जिजाउनी स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला,आणि शिवरायांद्वारे तो आमलात आणला.त्यांचा स्वराज्यविचार ही या मुलुखातिल नव्या युगाची नांदी होती हे आपल्याला विसरता येत नाही , मनुवाद्यानी स्त्रियाना गुलामीचे जीने बहाल केले होते समाजाच्या मोठ्या वर्गाला दैववादी बनविले होते, मानसा-मानसात जाती-पातीच्या भिंती उभ्या केल्या होत्या.
समाजातील क्षत्रियत्वाच्या विचाराकड़े पाठ फ़िरविली होती आणि समाज बलहीन, सत्वहीन आणि तेजोहीन बनविला होता.
या परीस्थितीत जिजाऊनी प्रयत्नवादाची कास धरली होती. रयतेच्या स्वत्वाला फुंकर घातली,त्यांच्यातिल स्वाभिमान जागा केला होता,आणि त्याना क्षात्रबान्याची शिकवन दिली.
ज्या कालात जिजाऊ सारख्या महिलेने स्वराज्यविचारांचे जागरण लोकांत केले , तो काल आणि परिस्थिती ध्यानात घेतली,की जिजाऊंप्रती असनारा आदर द्विगुणित होतो .
आदर्श राजपत्नी आणि राजमाता म्हणून तर त्या ख्यात आहेतच.पण एवढ्या वरच त्यांच्या ठायी वसलेली गुण संपदा आटोपता येत नाही .जो जो विचार करून तो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ठशीवपने लक्षात राहतात.
समर्थपने राज्यशकट पेलविनारया एक असामान्य कर्ताबगार प्रशासक,राजकारणाच्या उत्तम जाणकार.प्रतिकुल परीस्थितिवर मात करनारया कुशल मुत्सद्दी,आणि प्रशासनात तितक्याच कर्तव्यकठोर असनारया जिजाऊ,त्यांच्या कर्त्रुत्वामुलं अविस्मरनीय आहेत आणि भविष्यातही राहतील.
इतिहासा कडून पाठ घ्यायचा असतो अणि प्रेरणाही घ्यायच्या असतात,म्हणजे भविष्यात चाचपडन्याची वेल येत नाही.असो..
इतिहासाशी प्रमाणिक राहून "जिजाऊसाहेब" लिहिले आहे,त्यात कल्पनाविलासाला कुठेही जागा नाही,ना असत्याचा आधार घेतला,जे लिहिले ते संदर्भाना धरूनच....
- मदन पाटील.
संक्षिप्त परिचय :-
विदर्भातील बुलढाना जिल्ह्यातील सिन्दखेड राजा येथे १२ जानेवारीला म्हालसा रानींच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला , लखुजी राजांच्या लाडक्या "जिउ" बालपणा पासूनच अनेक कला मध्ये निपुण होत्या.
"या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे"
अंधार होत चाललायदिवा पाहीजे
या देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे ॥
जिजाऊ वंदना
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ
प्रसिद्ध विचारवंत-अशोक राणा.
special thanks to-
some part of this blog is taken from...
1) madan patil's "jijausaheb"( historical novel),swami pubs.,pune
2) ashok ranaa's "jijau wandanaa" from jijai publication's shivdharma sanskaarmala,pune
3) news about movie "rajmata jijausaheb" fom esakal,pune.
5) www.shivdharm.blogspot.com
No comments:
Post a Comment